Visitor count for this blog has now crossed 1200.
-------------------------------------------------------------------
I NEITHER ENDORSE NOR OBJECT TO THE VIEWS EXPRESSED IN THIS BLOG. THEY ARE SIMPLY COLLECTED AT ONE PLACE
I had earlier written about an article on Coconut Oil and Alzheimer's decease. It was found by Snoops that this claim was 'uncertain'.. Then recently I posted an article on Coconuts. That appeared more sensible, though not fully convincing. I have now got another article in Marathi. It is supposed to be from Dr.Meena Nerurkar, a renowned writer and Doctor practicing in USA. She has listed a number of health benefits from Coconuts, reinvented in recent times. She has written that her grandmother used to give coconut oil as a single cure for many problems. In addition it was supposed to be very useful for maintaining good overall health. Then as a Doctor who has studied western medical science she had discontinued using coconuts due to the propoganda made against it, probably instigated by Soyabeen lobby. However, her daughter is again using Coconut oil liberally. Thus it has come through a full circle.
Use of coconut oil for applying to hair or skin is a very popular practice in large parts of India and many people think it is beneficial. I think external application of coconut oil would not be harmful in any way. Questions are raised about its cholesterol contents (good or bad variety). This should be seen more critically by those who have hyperlipidimia problems.
I do not know whether the report is authentic and there is a 'Coconut lobby' at work now.
कोकोनट ऑइल
- डॉ. मीना नेरुरकर
कोणाचे नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर अचानक त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे. नर्सिंग होम्स व वृद्धाश्रमातले डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. ते पाहून त्यांच्या प्रियजनांच्या मुद्रेवर हसू झळकत आहे. लोकहो, नित्यनव्या डाएट फॅडमध्ये कोकोनट ऑइलसध्या शायनिंग स्टार झाले आहे.
माणसाचे नशीब पालटवायला जसा एखादा गॉडफादर लागतो तसं कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ.ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉड़फादर लाभला. अमेरिकेच्या र्होड आयलंड राज्यात राहणार्या या न्यूट्रिशनल डॉक्टरचा शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. छोट्या चणीचा पॉल स्वत:सारखेच छोटेसे दुकान चालवायचा व त्यात मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की, त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची. कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला कसले तेल विकतोस, कुठून आणतोस अशी विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून ते देतो.
ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता. त्याने पॉलच्या दुकानात वेळ घालवायला सुरुवात केली. खोबर्यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दामहून खोबर्याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट ऍटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असल्यामुळे त्याने हार्ट ऍटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर कोकोनटचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले.
ब्रूस या मिरॅकल ऑइलने इतका झपाटला होता की, त्याने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्यात cholesterol असतात हे खरे, पण ते Medium chain fattyacids असतात जे शरीराला हितकारक असतात. थायलंड, इंडोनेशिया फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्यावर जगतात. त्यांच्यात हार्ट ऍटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्यामुळे हार्ट ऍटॅक येत नाही असे विधान केले. शेकडो डॉक्टराकडे जाऊन त्यांना खोबरेल तेलाचे महत्त्व सांगायचा प्रयत्न केला, पण कोणावर ढिम्म परिणाम होत नव्हता. शेवटी डॉक्टरांचा नाद सोडून त्याने कोकोनट ऑइलचे फायदे पुस्तक रूपात लिहायचा निर्णय घेतला. १९९९ साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले.
ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून ती देखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला. डॉ. ब्रूसने एकूण १८ पुस्तके लिहिली. त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.लोक एकमेकाला ही पुस्तके भेट द्यायला लागले. केस, त्वचा यावर खोबरेल तेल लावून बघायला लागले. आता अनेक तरुण मंडळी खोबरेल तेल सर्रास वापरतात. यू ट्यूबवर अनेक हेल्थ फूड डॉक्टर नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.
माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर एकही इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल. परीक्षा आली की. डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची, केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची, कातडी चरबरीत होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची, कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची.सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची. ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते. सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजीसारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण तिच्यावरही वरताण म्हणून ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते.
Coconut oil has come in a full circle in our house. आमच्या घराण्यात दोन पिढ्यांनंतर खोबरेल तेल परत वापरात आले आहे. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही खूप लोकप्रिय होत आहे. आता मीही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. अजून मुलीसारखी तेल प्यायला लागलेले नाही, पण कोकोनट ऑइल अँटीएजिंग आहे असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत असल्यामुळे तसे करायला मला फार वेळ लागणार नाही.
कोणाचे नशीब कधी पालटेल ते सांगता येत नाही. जसे माणसाचे बदलते तसे एखाद्या पदार्थाचेही बदलते.

The way the coconut oil is extracted in India is by squeezing dried coconut pieces in an oil extraction mill (घाणा), & not by the method described in this Marathi article.
ReplyDeleteIs the oil extracted from a mill equally effective in fighting Alzeimer’s Disease?
Can you let me know Dr. Meena Nerurkar’s email ID or phone number?
नेरूरकर काेकणातली
ReplyDeleteकाेकाेनट गुरू ब्रुसच काैतुक?????
आपल्या आजी-आजाेबांच काैतूक कराव?
आमटीत खाेबरेल किसून टाकले?????
यात नवीन काय??????
आम्ही राेजच वापरताे।